Vaman Chikitsa

वमन चिकित्सा

वमन म्हणजे मुखाव्दारे उलटी वाटे शरीरशुद्धी होय. पण वमन आणि उलटी होणे ह्यात बराच फरक आहे. वमन लगेच होत नसते. वमनासाठी आधी स्नेहपान, स्नेहन, स्वेदन व नंतर वमन असा क्रम असतो. लगेच जसे मीठाचे पाणी पिवून उलटी करुन घेणे म्हणजे वमन नव्हे. उदा. जर सतत सर्दीचा त्रास असेल तरी आपण वमन करु म्हणजे तेथील आपल्याला Sinuses मधील, फुफ्फुसातील कफ दोष बाहेर काढायचा आहे. मग साहजिकच प्रश्न पडतो त्यासाठी काय?

त्यासाठी आपणास प्रथम ५ ते ७ दिवस तुप घ्यावे लागते. रुग्णानुसार औषधांनी तुप सिद्ध केल्या जाते व ते तुप साधारणत: ५० ते ६० मि.ली. रोज यानुसार ५ दिवस घ्यावे लागते. स्वेदनामुळे तुपाचे अणुरेणू कफाशी संलग्न होतात आणि मसाज व स्टीमबाथमुळे तेथुन सुटून ते पोटात आणले जातात. सहाव्या दिवशी तुप नसते परंतू संध्याकाळी विशिष्ट आहार जेवायला सांगितला जातो व सातव्या दिवशी वमन राहते. आधल्या दिवशी पोट साफ व्हायचे औषध दिले जाते व दुसऱ्या दिवशी पहाटे वमनसाठी बोलवण्यात येते. सकाळी मसाज व स्टीमबाथ करुन वमनसाठी घेण्यात येते. एरवी उलटी होते तेव्हा त्यात न पचलेले अन्न असते. त्याला दुर्गधी राहते, डोके दुखते पण वमनमध्ये तसा त्रास होत नाही. उपाशी पोटी रुग्णास बोलविण्यात येते व औषधींनी सिद्ध काढा पिण्यास दिला जातो व वमनाचे चाटण दिल्यानंतर साधारणत: १० ते १५ मिनीटांमध्ये वमनाचे वेग सुरु होतात व जमा असलेला कफ, पित्त बाहेर पडते.

ह्या प्रक्रियेमध्ये फारसा थकवा येत नाही. काढा लगेच बाहेर येत असल्यामुळे त्याला दुर्गंधी नसते. उलट्या करवून घेतलेल्या असल्यामुळे केव्हाच सलाईन लावायचे काम पडत नाही. आपल्या दैनंदिन कामासोबत आपणास वमन करता येते. फक्त वमनाच्या दिवशीच आराम असतो. वमनानंतर टप्प्याटप्प्याने आहार वाढविला जातो व यास ‘संसर्जन क्रम’ असे म्हणतात.

     वमनामुळे सतत सर्दी, दमा, श्वास (अस्थमा), मधुमेह, आमवात, कोड, पिंपल्स, सोरियासिस, त्वचाविकार स्थौल्य, PCOD, गर्भाशयाचे आजार, वांग इत्यादींमध्ये उपचारानंतर फायदा होतो.

     हृदयरोग, मधुमेह, कॅन्सर होवू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निरोगी व्यक्तीसही वमन करता येते. रुग्णास केव्हाही व निरोगी व्यक्तींनी वसंत ऋतुत दरवर्षी वमन करावे. म्हणूनच वमन, विरेचन व बस्ती यास आयुर्वेदाचे Triple Antigen म्हणतात.