नस्य ह्या छोट्याशा प्रकाराचा देखील पंचकर्मामध्ये समावेश केला आहे. कारण आयुर्वेद म्हणजे ‘नासा हि शिरसो व्दारम्’ म्हणजे नाक हे शिर (डोक्याचे) व्दार आहे. शिरोरोगावर नस्य ही मुख्य चिकित्सा आहे.
नस्य म्हणजेच नाकाचे औषधीसिद्ध तेल अथवा तुप टाकणे. नस्य करण्याच्या आधी कपाळ आणि नाकाचा परिसर यामध्ये मसाज करुन शेक दिल्या जातो व नाकात औषधी थेंब सोडले जातात. नस्य मुळे स्मृती वाढते. नेत्रविकार, शिरोरोग, अर्धशिशी, डोकेदुखी, पक्षाघात, केशपतन, आदींवर उपयुक्त आहे.