Shirodhara

शिरोधारा

शिरोधारा ही पंचकर्माची प्रकार नाही, परंतू आजच्या काळातील सर्वांत जास्त प्रसिद्ध व आवश्यक असणारी ही क्रिया होय. शिरोधारा म्हणजे कपाळावर, भुमध्याच्यावर असणाऱ्या मर्मावर औषधी तेल, तूप, काढा, ताक, दुध इत्यादींची धारा धरणे. ही धार ४० मि. पर्यंत सोडली जाते.
शिरोधारा – सद्य: काळातील टेंशन मुक्तीचा खात्रीशीर उपाय.
              संघर्ष, चिंता, चिडचिड, निद्रानाश, मनोविकार, नैराश्य यामुळे शांतता हरवून बसलेल्या या आधुनिक जगात प्रत्येकालाच गरज वाटतेय ती शांततेची, ………..पर्यांयाने मानसिक स्वास्थाची……….यावर उपयुक्त असा आयुर्वेदातील शिरोधारा हा खात्रीशीर उपचार.
     यांत्रिक शिरोधारा उपकरणाव्दारे आल्हाददायक, शांततापूर्व व प्रसन्न अशा कक्षामध्ये शिरोधारा केल्यास पुर्णत: मानसिक शांती लाभते.
     स्वास्थपूर्ण व्यक्तिही याचा अनुभव वारंवार घेवु शकतात.
     शिरोधारामुळे मन प्रसन्न तर होतेच परंतू आत्मविश्वास देखील वाढतो. चिडचिडेपणा घालविणारा, शांत व मर्यांदित झोप, मन:शांती देणारा आयुर्वेदातील एक खात्रीशीर उपाय म्हणजे शिरोधारा ।