रक्तमोक्षण चिकित्सा
(Blood Letting)
रक्तातील अशुद्धी दुर करण्याकरीता Needle व्दारे किंवा जलौका (Leach) व्दारे शरिर शुद्धी करणे.
Blood Leting म्हणजेच रक्तमोक्षण होय. दुषित झालेले दोष रक्तामध्ये आश्रीत होऊन रक्ताला दुषित करतात. म्हणून रक्तशुद्धीसाठी रक्तमोक्षण केल्या जाते. राक्तमोक्षण दोन प्रकारे केले जाते.
- Needle – सुईव्दारे
- Leach Theorapy – जलौकांव्दारे
ज्या ठिकाणी वेदना असतील त्याच्या जवळची Vein बघून निर्जंतुक सुईव्दारे साधारणत: ४० ते ५० मि. ली. रक्त रुग्णाचे बल तसेच व्याधिचे बल बघुन काढल्या जाते. आयुर्वेदानुसार प्रथम जे रक्त स्त्रवते ते दुषित असते. म्हणजे त्यात infection असते असे नाही परंतू कफ, पित्त आदी दुषित झालेले दोष ज्या अनुषंगाने व्यधि असतो, रक्त बाहेर पडल्यामुळे त्यांची संप्राप्ती भंग होते व रुग्णास फायदा होतो. आपल्या शरीरात साधारणत: ५ लिटर रक्त असते त्यामुळे फक्त ४० ते ६० मि. ली. रक्त काढल्याने कुठलाच फरक पडत नाही अथवा थकवा येत नाही.
स्थानिक रक्तमोक्षण करण्यासाठी Leach म्हणजेच जलौका वापरल्या जातात. जलौका हा पाण्यात सापडणारा एक अळीसारखा प्रकार होय. ही फक्तअशुद्ध रक्तच पिते. एक जलौका जास्तीत जास्त ५ ते १० मि.ली. एवढेच रक्त पिवु शकते. शुद्ध रक्त येताच ती रक्त पिणे सोडून देते. त्यामुळे जलौका रक्त पित राहते, ती शरीरात आत जाते हे नुसते गैरसमज आहेत. जलौकामुळे एकाची व्याधी दुसऱ्याला होत नाही. तरीही सद्यपरिस्थिती बघता आम्ही एकदा वापरलेल्या जलौका पुन्हा वापरत नाही. जलौका जानुंधिशुल, वारंवार वाढणारे टॉन्सिल्स, पिंपल्स, त्वचारोग, सोरयिसिस, पांढरे कोड, Herpis zoster आदि व्याधींवर लावल्या जाते.
सार्वदेहिक (Needle व्दारे) रक्तमोक्षणामुळे कफ, पित्त विकृती निघुन रक्ताची अतिस्त्यानता कमी होते. म्हणजेच आपण त्याचा कफ दोष काढून टाकुन त्याला आवश्यक तेवढे द्रवत्व देवू शकतो. म्हणजेच Hypercholestrol वर याचा चांगला फायदा होतो व हृदयविकारावर प्रतिबंधक उपाय होतो. साध्या रक्तमोक्षणामुळे अनेकांची टाचदुखी कायमची जावू शकते.