Basti chikitsa
बस्ती चिकित्सा
‘बस्ती जिरविते वाताची मस्ती’ . बस्ती म्हणजे वातरोगाची ‘अर्धी चिकित्सा’ होय. बस्ती म्हणजे Medicated Enema. परंतु फक्त पोट साफ होणे इतका साधा बस्तीचा उद्देश नाही. रबरी नळीव्दारे गुदमार्गातून तेल किंवा काढा आत सोडणे म्हणजे बस्ती होय. कारण शेवटचे आतडे हे वाताचे घर होय व वाताचे शोधन किंवा शमन करण्याकरीता बस्ती देण्यात येतो. बस्तीसाठी एक रबरी कॅथेटर वापरल्या जाते. ते निर्जंतुक केलेले असते त्यामुळे बस्तीमुळे Infection होईल हा नुसत्या भ्रामक कल्पना आहे. तत्पूर्वी औषधीसिद्ध तेलाने शरीराचा किंवा अपेक्षीत भागाचा मसाज करून औषधी काढ्याच्या वाफेने शेक दिल्या जाते व नंतर बस्ती केल्या जाते.
बस्ती हे दोन प्रकारचे असतात – औषणसिद्ध (१) तेल, तुपाचा बस्ती (2) काढ्याच्या बस्ती, तेल, तुपाचा बस्ती आतमध्ये राहणे अपेक्षीत असते. काढ्याच्या बस्तीनंतर लगेच शौचास जावे लागते. बस्ती हे पक्वाशय म्हणजे वाताच्या स्थानी दिल्या जातो व वातावरवे उत्तम औषध म्हणजे तेल म्हणून बस्तीचा फायदा लगेच दिसतो व दिर्घकाल टिकतो. बस्तीमुळे हाडाची झालेली झिज भरुन निघते तसेच शरीराच्या पेशींची नवनिर्मिती, rejuvenation करण्याचे काम करते. म्हणून चाळीशीनंतर प्रत्येकाने न चुकता दरवर्षी बस्ती करावा म्हणजे आजार होणारच नाही.
बस्ती हा संधिवात, आमवात, ऑस्टिओपोरोसिस, हृदयरोग, जानुसंधिशुल, Silp disc, मणक्यांचे आजार, गर्भाशयाचे आजार, Paralysis, Cervicle Spndylosis, Lumber Spondylosis यावर अत्यंत उपयुक्त आहे. सायटिका, Cord Compression, हाडाची झिज यावर उपयुक्त आहे. निसर्गत: पावसाळ्यात वात दोष वाढतो म्हणून सर्वांनी पावसाळ्यात बस्ती करावाच.