Virechana Chikitsa
विरेचन चिकित्सा
शास्त्रोक्त पद्धतीने जुलाबावाटे शरिरातील वाढलेले पित्त, उष्णता बाहेर काढणे म्हणजे विरेचन चिकित्सा होय.
विरेचन पंचकर्मातील शरीर शुद्धीचाच एक प्रकार होय. जुलाबाव्दारे शरीर शुद्धी म्हणजे विरेचन. परंतू लगेच जुलाबाचे औषध दिले तर फक्त आतड्याची (Large Instestine) शुद्धी होईल व ते आपल्याला अपेक्षीत नाही. विरेचन म्हणजे पित्त दोषाची पुर्ण व कफ दोषाची अर्धी चिकित्सा होय. प्रथम दोष पोटात आणुन नंतर त्याचे जुलाबाव्दारे शोधन म्हणजे ‘विरेचन चिकित्सा’ होय.
त्यासाठी प्रथम स्नेहपान करावे लागते. स्नेहपान म्हणजे औषधीसिद्ध तुपाचे सेवन करणे. आपल्या आजाराच्या अनुषंगाने आम्ही औषधींनी सिद्ध केलेल तुप आपणास ५ ते ७ दिवस दिल्या जाते. सम्यक स्नेहाचे लक्षण म्हणजेच त्वचा तुकतुकीत होणे, शौचास स्निग्धता येणे दिसु लागताच स्नेहन पुर्ण झाले असे म्हणता येईल. स्नेहपान आपणास घरीच करायचे असते. चहा, कॉफी किंवा दुधात स्नेह टाकुन आपण घेऊ शकतो. याने कुठलाच त्रास होत नाही. आपल्या दैनंदिन कार्यक्रमातही कुठलाच व्यत्यय येत नाही.
स्नेहपान सुरु असतांनाच आपण बाह्यत: स्नेहन करतो. म्हणजेच पुर्ण शरीराचा औषधी सिद्ध तेलाने मसाज तसेच स्टीमबाथ (औषधीयुक्त वाफेने आंघोळ). हे करण्यास साधारणत: अर्धा ते पाऊण तासाचा वेळ आपणास द्यायचा असतो. मसाज स्टिमबाथमुळे कफपित्ताचे अणुरेणु तेथून सुटून तुपाशी संलग्न होतात व नंतर जुलाबाव्दारे ते शरीरातून बाहेर काढल्या जातात. साधारणत: ५ दिवस स्नेहपान केल्यानंतर ६ व्या दिवशी स्नेहपान नसते पण संध्याकाळी विशिष्ट प्रकारचा आहार म्हणजे उत्क्लेषक आहार घेण्यास सांगितले जाते व ७ व्या दिवशी सकाळी रुग्णबल व रोगबलानुसार औषधाची मात्रा ठरवून विशिष्ट प्रकारची औषधे आपणास देण्यात येते. औषधाच्या सेवनानंतर ८ ते १० मलप्रवृत्तीच वेग येतात व शरीराची आंतरिक शुद्धी होते. ह्या पंचकर्म प्रक्रियेत थकवा येत नाही. ८ ते १० वेळा जुलाब होवुनही रुग्ण ‘Fit & Fine’ असतो. ह्यात कुठल्याच प्रकारचे Infection असत नाही. आणि त्यामुळे ताप, Dehydration असं काही राहत नाही.
विरेचनाचे फायदे –
पित्त दोषाचे आजार होवू नये म्हणून आम्लपित्त, Gastric Uicer, deiodenal Uicer, आमवात, संधीवात, अतिस्थौल्य, त्वचेचे विकार, पचनाशी संबंधित तक्रारी, पक्षाघात, कोलेस्टेरॉल कमी करणे तसेच निरोगी राहण्यासाठी विरेचन केले जाते.