panchakarma
पंचकर्माविषयी प्रस्तावना
वमन, विरेचन, बस्ती, नस्य व रक्तमोक्षण अशा पाच क्रिया असल्यामुळे यांना ‘पंचकर्म’ असे म्हटल्या जाते. याविषयी आपण आता माहिती पाहु.
पंचकर्म चिकित्सा ही आयुर्वेदिय चिकित्सा पद्धतीचाच भाग आहे. भारतावर मधल्या काळामध्ये झालेल्या परकीय आक्रमणांमुळे ही चिकित्सा थोडी मागे पडली होती. परंतु या चिकित्सेने रोग्यांना मिळणाऱ्या पूर्णत: उपशयामुळे ही पद्धती पुन्हा गगनभरारी घेतांना दिसून येत आहे. या चिकित्सेविषयी लोकांमध्ये ‘समज कमी व गैरसमज जास्त’ अशी आज परिस्थिती आहे.
पंचकर्म करतांना –
- शारीरिक त्रास होत नाही.
- आराम करावा लागत नाही.
- सुट्या काढाव्या लागत नाही.
- उपाशी राहावे लागत नाही.
- खुप खर्च येत नाही.
- रुग्णालयात भरती व्हावे लागत नाही.
- वयाचे बंधन नसते.
पंचकर्म विषयी लोकांना असणारी प्रचंड उत्सुकता लक्षात घेता कावरे आयुर्वेद, पंचकर्म हॉस्पीटल मागील १५ वर्षांच्या प्रात्यक्षिक अनुभवाच्या आधारे लोकजागृतीकरीता ‘पंचकर्म पुस्तिका’ प्रकाशीत करीत आहे.
पंचकर्म म्हणजे अशा पाच क्रिया ज्यांव्दारे शरीराची आंतरीक शुद्धी होते.
आपल्या शरीरामध्ये वात, पित्त व कफ असे तीन घटक असतात. हे समान प्रमाणात असले तर आपण निरोगी असतो. यापैकी कोणत्याही घटकामध्ये बदल झाल्यास आपल्याला त्या त्या घटकाच्या अनुषंगाने तो तो आजार होऊ शकतो. उदा. सामन्यत: माहित असणाऱ्या कफदोषामुळे छातीमध्ये होणारा कफाचा आजार, पित्तदोषच्या वाढीमुळे ॲसिडिटी, त्वचारोग वगैरे किंवा वातामुळे कंबर, गुडघे दुखणे वगैरे.
या दोषांचे शरीरामध्ये विशिष्ट मुख्य स्थान असते. उदा. कफाचे आमाशय, वाताचे बृहद् आंत्र वगैरे. त्यामुळे त्यांच्यामध्ये वाढ झाल्यास त्यांच्या मुख्य स्थानामध्ये ते प्रथम दिसून पडतात व जास्तच वाढ झाल्यास त्यांच्या शरीराच्या अन्य उपस्थानांमध्ये त्यांची वाढ दिसून पडते.
आयुर्वेदिक आभ्यंतर चिकित्सेने वाढलेल्या दोषांना शरीराच्या नष्ट करण्यासोबतच वाढलेल्यांना शरिराच्या बाहेर फेकले तर औषधी कमी घ्यावी लागेल, आजार मुळापासून नष्ट होतील व त्यांचे पुनुरुद्भव अतीशय संथ गतीने होईल. आपण नित्य जीवनामध्ये सुद्धा नैसर्गिक शुद्धी वारंवार बघत असतो.
उदा.
- अम्लपित्ताचा खुप त्रास होत असल्यास औषधी घेण्याऐवजी उलटी केल्यामुळे बरे वाटते.
- रोज घर झाडतो परंतू दिवाळी-दसऱ्याला संपूर्ण घराची सफाई केल्यास वर्षभर स्वच्छतेला वाव मिळतो.
- प्राण्यांमध्ये सुद्धा उदा. कुत्रे, मांजर पोट बिघडल्यास गवत खाऊन उलटी करतात.
वमन, विरेचन, बस्ती, नस्य व रक्तमोक्षण अशा पाच क्रिया असल्यामुळे यांना ‘पंचकर्म’ असे म्हटल्या जाते. याविषयी आपण आता माहिती पाहु.